पँंडोरा पेपर्समधुन धक्कदायक बाब उघडकीस
। नवी दिल्ली । वृत्तसंस्था । तपास यंत्रणांना गुंडाळणे, कर प्रणालीतून पळवाटा शोधून आपली संपत्ती लपवण्यासाठी जगभरातील अतिश्रीमंतांनी केलेले धक्कादायक प्रयत्न पँडोरा पेपर्समधून समोर आले आहेत. इंडियन एक्सप्रेस या वृत्तपत्रात पँडोरा पेपर्सने केलेल्या गोपनीय तपासाचे वृत्त प्रसिद्ध केले आहे. यात भारतरत्न सचिन तेंडुलकरसह 300 हून अधिक भारतीय उद्योजकांची नावे असल्याने कॉर्पोरेट जगतात एकच खळबळ उडाली आहे.
इंटरनॅशनल कन्सोर्शियम ऑफ इन्व्हेस्टिगेटीव्ह जर्नलिस्ट (खउखग) या जागतिक पातळीवरील पत्रकारांच्या समूहाने विशेष शोध मोहीम राबवली. या दरम्यान कर चुकवेगिरीचे नंदनवन असलेल्या देशातील 14 कंपन्यांचे थोडेथोडके नव्हे तर तब्बल 1 कोटी 20 लाख दस्त आणि 29 हजार मालकी कंपन्यांची गोपनीय माहिती तपासली असल्याचा दावा पँडोरा पेपर्सने केला आहे. जवळपास एक वर्ष केलेल्या तपास मोहीमेत अनेक बड्या उद्योजकांनी कर चुकवेगिरीसाठी तसेच काळा पैसा दडवण्यासाठी केलेल्या युक्त, पळवाटा आणि परदेशात केलेल्या व्यवहारांचा उलगडा करण्यात आला आहे. कर कायदयातील पळवाटा शोधून अनेक भारतीय उद्योजकांनी परदेशात संपत्ती दडवली असल्याचा दावा इंडियन एक्सप्रेसने केला आहे.







