| खोपोली | प्रतिनिधी |
खालापूर येथील स्वामी समर्थ मठातील मंदिरातून चोरट्यांनी तब्बल 1 लाख 65 हजार रुपये किमतीच्या चांदीच्या पादुका लंपास केल्या होत्या. या प्रकरणी दोन संशयितांना अवघ्या चार दिवसांत पुणे परिसरातून अटक करण्यात खालापूर पोलिसांना यश आले आहे. सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक तपास आणि पोलिसांची सतर्कता यामुळे मंदिर चोरीच्या प्रकरणाचा अल्पावधीत छडा लागला असून, पोलिसांच्या या उल्लेखनीय कामगिरीचे कौतुक होत आहे. अटक करण्यात आलेल्या दोन्ही आरोपींना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. चोरीला गेलेल्या चांदीच्या पादुका तसेच गुन्ह्यात वापरण्यात आलेल्या वाहनाबाबत पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.
पादुका चोरणाऱ्या संशयितांना अटक
