| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
इंडियन प्रीमियर लीग 2026 स्पर्धेच्या हंगामात मुंबई इंडियन्सची कामगिरी फारशी चांगली झालेली नाही. त्यातच आता दुष्काळात तेरावा महिना म्हणजे त्यांचा स्टार खेळाडू सलामीवीर रोहित शर्मा दुखापतग्रस्त झाला आहे. आता मुंबई इंडियन्सचा हेड कोच महेला जयवर्धने रोहित शर्माच्या दुखापतीवर आपलं मौन
तोडलं आहे.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध मुंबई इंडियन्सचा माजी कर्णधार आणि अनुभवी फलंदाज रोहित शर्मा दुखापतग्रस्त झाला होता. मुंबई इंडियन्सचे मुख्य प्रशिक्षक महेला जयवर्धने यांनी आता मौन तोडलं आहे. जयवर्धनेच्या मते रोहित शर्माची दुखापत जास्त गंभीर नाही. तो लवकरात लवकर प्लेइंग इलेव्हनमध्ये परत येईल. पुढे जयवर्धने म्हणाला, आम्हाला त्यावर जास्त दबाव टाकायचा नाही आणि अजून हंगामाची सुरुवातच आहे, त्यामुळे मेडिकल टीम त्याच्याबाबत निर्णय घेईल.
रोहितच्या फिटनेसबाबत सस्पेन्स कायम
