मुरूड आगार बंद आंदोलनाला स्थगिती

Exif_JPEG_420

। आगरदांडा । प्रतिनिधी ।

मुरुड आगारातील अवस्था एवढी भयानक असुन जुन्या भंगार अवस्थेत असलेल्या एसटीवर आपले आगार चालत असल्याने प्रवाशांना प्रवास करताना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. यामुळे पद्मदुर्ग व्यावसायिक कल्याणकारी मंडळाचे अध्यक्ष अरविंद गायकर यांनी आपल्या पदाधिकार्‍यांसह आगारात जाऊन समस्यांबाबत चर्चा करण्यात आली. जर सुधारणा होत नसेल तर (दि.2) जुनपासुन आगार बंद आंदोलन करु, असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला होता. याची दखल घेत पेणचे उपविभागीय अधिकारी मनिषा पाटील व उपविभागीय कार्यशाळा अधिकारी चेतन देवधर यांनी मुरुड डेपोत येऊन निवेदन देणारे अरविंद गायकर व पदाधिकार्‍यां सोबत समस्यांबाबत चर्चा करण्यात आली.

यावेळी मनिषा पाटील यांनी सांगितले की, तुमच्या मागण्या बहुतेक मान्य केल्या आहेत. अलिबागवरुन सकाळी सव्वासात वाजता मुरुड-अलिबाग सुरू केली आहे. जर कुठल्या गाड्या सुटत नसतील तर त्याची माहिती द्यावी. अंतर्गत रस्ता ही सुरू केला आहे. राहिला नविन गाड्यांचा प्रश्‍न. तो ही लवकरात लवकर सोडवु. तरी (दि.2) जुनला होणारा आगार बंद आंदोलन स्थगित करावे. अशी विनंती यावेळी करण्यात आली. तसेच, चेतन देवधर यांनी सांगितले की, रेवदंडा पुलावरून 14 टनच्या गाड्यांना परवानगी नसल्यामुळे आपल्याकडे नविन गाड्या येऊ शकल्या नाहीत. सार्वजनिक बांधकाम विभागाकडुन पत्र मिळाले तर नविन गाड्या मिळु शकतात. अशी प्रतिक्रिया यावेळी चेतन देवधर यांनी दिली.

Exit mobile version