कोल्ह्याचा संशयित मृत्यू

| उरण । वार्ताहर ।

उरण पनवेल रस्त्याच्याकडेला रविवारी एक कोल्हा मयत झालेला आढळला आहे. कोल्ह्याचा मृत्यू संशयीत असल्याचे बोलले जात आहे. उरण परिसरतातील वन्यजीव धोक्यात आले आहेत. उरण हे सध्या औद्योगिक दृष्ट्या झपाट्याने विकसित होत असलेला तालुका आहे. त्यामुळे येथील जंगल परिसराचा मोठया प्रमाणात विध्वंस केला जात आहे. यामध्ये जंगलांची तोड केली जात आहे. तसेच डोंगर ही पोखरले जात आहेत. त्यामुळे निसर्ग ही नष्ट होऊ लागली आहेत. उरणच्या पश्‍चिम विभागात खाडी किनार्‍यावर कांदळवनात कोल्हे आढळले आहेत. काही दिवसांपूर्वी दोन कोल्हे दिसून आले होते. ही कोल्ह्याची प्रजाती लुप्त होऊ लागली आहे. तर काही दिवसांपूर्वी चिरनेरच्या जंगलात मोर आणि डुक्कर यांची शिकार केली जात आहे. त्यामुळे उरणमधील वन्यजीव धोक्यात आले आहेत.

Exit mobile version