| उरण । वार्ताहर ।
उरण येथील खोपटा कोप्रोली मार्गावर रविवारी मोठ्या प्रमाणात जड कंटेनर वाहनांच्या रांगाच रांगा लागल्या होत्या. त्यामुळे जेएनपीटी प्रमाणेच तालुक्यातील ग्रामीण भागाला ही कंटेनर वाहनांचा विळखा पडू लागला आहे. परिणामी येथील नागरिकांना जड वाहनांच्या कोंडीचा सामना करावा लागत आहे.
जेएनपीटी बंदरावर आधारित कंटेनरमधील माल साठवणुकीसाठी उभारण्यात आलेली. गोदामे ही पूर्वी उरणच्या पश्चिम विभागातच होती. मात्र ती सरकून सध्या खोपटा खाडी पलीकडील पूर्व विभागातही उभी राहिली आहेत. या गोदामांची संख्या वाढू लागली आहे. उरण तालुक्यातील खोपटा,कोप्रोली,चिरनेर,कळबूसरे, विंधणे, भोम टाकी, दिघोडे, वेश्वी, चिर्ले, जांभुळपाडा आदी गावात ही गोदामे उभी राहत आहेत. त्यामुळे बंदरातून मालाची ने-आण करणारी शेकडो जड कंटेनर वाहने या भागातील रस्त्यावरून प्रवास करू लागली आहेत. त्यामुळे या मार्गवर अपघात व कोंडी यांना येथील प्रवाशांना सामोरे जावे लागत आहे.