विवाहितेचा संशयास्पद मृत्यू! नवऱ्यासह पाच जणांना अटक

उकरुल येथील तरुण गायिकेचा दुर्दैवी मृत्यू

| नेरळ | प्रतिनिधी |

कर्जत तालुक्यातील उकरुल येथील विवाहित महिलेचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. त्या महिलेला आत्महत्या करण्यास परावृत्त केल्याप्रकरणी नेरळ पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल असून, पोलिसांनी नवऱ्यासह पाच जणांना अटक केली आहे.

नेरळ येथील हार विक्रेते संतोष दळवी यांची 21 वर्षीय कन्या करीना हीचा मार्च 2021 मध्ये तालुक्यातील उकरुल येथील सचिन मोहिते यांच्याशी विवाह झाला होता. करीना ही भजनी गायिका म्हणून रायगड आणि ठाणे जिल्ह्यात प्रसिद्ध होती आणि तिचे भजनाचे कार्यक्रम तसेच भजनाची जुगलबंदी असे कार्यक्रम सर्वत्र होत असत. सचिन मोहिते हा तरुण रसायनी आद्योगिक वसाहतीत नोकरीला असून घरात राहत असताना मोहिते यांच्या घरातील सर्वच मंडळी यांच्याकडून त्रास होत होता, मात्र त्याबद्दल तिने कोणालाही कोणतीही तक्रार केली नव्हती. मात्र मोहिते कुटुंब सतत स्नेहा तथा करीना हीचा मानसिक छळ आणि शारीरिक छळ नवरा सचिन तसेच सासू, सासरे आणि दोन्ही नणंद यांच्या कडून सुरू होता.

स्नेहा ही जेव्हा पाच महिन्यांची गरोदर होती, तेव्हा देखील सचिन मोहिते हे तिला तुझे कोणाशी तरी प्रेमसंबंध आहेत असे बोलून तिचे चारित्र्यावर संशय घेवून तिला मानसिक त्रास दिला होता. उकारुल येथील त्यांचे घरात काहीही घटना घडली तरी तिलाच जबाबदार धरून शिवीगाळ करून मानसिक त्रास देत होते.

शनिवार (दि.8) करीनाने आत्महत्या केली होती. मात्र त्यावेळी जिवंत असलेल्या करीना यांच्यावर बदलापूर येथील खासगी रुग्णालयात उपचार घेत असताना मृत्यू झाला असता, पोलीस केस झाल्याने मृतदेह मुंबई येथील जे. जे. हॉस्पिटल येथे नेवून शववि्छेदन करण्यात आले. मात्र सासरच्या लोकांच्या त्रासाला कंटाळून करीना तथा स्नेहा सचिन मोहिते हिने आत्महत्या केली असल्याची फिर्याद नोंदवल्या नंतर नेरळ पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल झाला. विवाहितेला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी नेरळ पोलिसांनी नवरा, सासू, सासरे तसेच दोन्ही नणंद यांना अटक केली आहे.

Exit mobile version