सुतारवाडी ग्रामस्थांनी खा. सुनील तटकरे यांची घेतली भेट

| सुतारवाडी | वार्ताहर |
खासदार सुनील तटकरे यांच्या गीताबाग येथील कार्यालयात सुतारवाडी येथील ग्रामस्थांनी भेट घेतली. यावेळी सुतारवाडी येथील महिला तसेच पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी सुतारवाडी येथील बांधण्यात येणारा पाझर तलाव, स्मशानभूमी शेड व रस्ता अंतर्गत रस्ते तसेच सुतारवाडी नाक्यावर सुसज्ज असे बसस्थानक याबाबत चर्चा करण्यात आली. तसेच खा. सुनील तटकरे यांनी त्वरीत संबंधित कामाबद्दल अधिकारी वर्गाला सूचना देऊन ती कामे मार्गी लावण्यास सांगितले. यावेळी ग्रामस्थांनी समाधान व्यक्त करुन खा. सुनील तटकरे यांचे विशेष आभार मानले.

Exit mobile version