स्वदेस मित्रांचा गुणगौरव उत्साहात

| माणगाव | वार्ताहर |

रॉनी स्क्रूवाला व झरीना स्क्रूवाला यांच्या स्वदेस फाऊंडेशनच्या वतीने माणगाव, तळा, महाड, पोलादपूर, म्हसळा, श्रीवर्धन आणि सुधागड येथील स्वदेस फाऊंडेशनतर्फे गाव पातळीवर आरोग्याचे स्वयंस्फूर्तीने काम करणाऱ्या स्वदेस मित्रांचा गुण गौरव सोहळा नुकताच माणगाव येथील गांधी मेमोरियल हॉल येथे करण्यात आला. यासाठी मॅनकाइंड फार्मा कंपनीने सहकार्य केले.

आरोग्य उपक्रमामध्ये अतुलनीय आणि सर्वोत्कृष्ट काम करणाऱ्या 42 स्वदेस मित्रांचा पारितोषिक आणि प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला. स्वदेस फाउंडेशनच्या संस्थापक झरीना स्क्रूवाला यांनी दूरदृश्य प्रणाली द्वारे मार्गदर्शन करून पुरस्कार प्राप्त स्वदेस मित्रांचे कौतुक केले. यावेळी स्वदेस फाउंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी मंगेश वांगे, अखिलेश डीमरी, माणगाव उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. सचिन गोमसाळे व शंकरा आय हॉस्पिटलचे डॉ. राजेश कापसे, तालुका आरोग्य अधिकारी महाड डॉ. नितीन बावडेकर, तालुका आरोग्य अधिकारी तळा डॉ. वंदन कुमार पाटील, तालुका आरोग्य अधिकारी म्हसळा डॉ. प्रशांत गायकवाड, तालुका आरोग्य अधिकारी सुधागड डॉ. शशिकांत मढवी, डॉ. दिपाली पुरी उपस्थित होते.

Exit mobile version