स्वामी विवेकानंद जयंती सप्ताह सुरु

| म्हसळा | प्रतिनिधी |

श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर संचलित न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनि. कॉलेज, म्हसळा विद्यालयात श्री स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. दि 12 जानेवारी ते 19 जानेवारी दरम्यान श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेमध्ये श्री स्वामी विवेकानंद जयंती सप्ताह साजरा करण्यात येते. याप्रसंगी पहिल्या दिवसाचे पुष्प गुंपण्यासाठी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ शिक्षक एकनाथ पाटील यांनी आपल्या मनोगतात अथांग परिश्रमामुळे गरिबीवर मात करून यशाची गोड फळे प्राप्त होतात, असा संदेश दिला. त्याचबरोबर कार्यक्रमाच्या प्रमुख स्थानी न्यू इंग्लिश स्कूल म्हसळा विद्यालयाचे चेअरमन समीर बनकर यांनी आपल्या मनोगतात स्वामी विवेकानंद या महान समाजसुधारकने भारतीय हिंदू संस्कृती सातासमुद्रापलीकडे नेण्याचे कार्य केले असून आपण आपल्या हिंदू संस्कृतीची जपवणूक केली पाहिजे व त्याबरोबर संस्कार जपले पाहिजेत असे सांगितले. या कार्यक्रमानिमित्त विविध विद्यार्थ्यांनी वेगवेगळी वेशभूषा केली होती. यामध्ये स्वामी विवेकानंद यांच्या वेशमध्ये स्वराज उध्दरकर, डॉ. बापूजी साळुंखे यांच्या वेशमध्ये अद्वेत कदम व जिजाऊ यांच्या वेशमध्ये लावण्या साळुंखे आले होते. या कार्यक्रमानिमित्त म्हसळा शहरातून भव्य मिरवणूक काढण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक क्रीडा शिक्षक हनुमंत मोरे यांनी केले व आभार प्रदर्शन प्राध्यापिका वैशाली खुताडे यांनी मानले. याप्रसंगी मंचावर विद्यालयाचे प्राचार्य डी. आर.पाटील, पर्यवेक्षक जे. के.मांजरेकर ज्युनिअर कॉलेज विभाग प्रमुख देवगावकर, एस. ए. शिर्के, प्राध्यापिका व्ही. एम. जमदाडे, एल. पी. सहारे सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Exit mobile version