स्वामिनारायण गुरुकुलचा निकाल 100 टक्के

विश्वतेज काटगावकर सर्वप्रथम

| रसायनी | वार्ताहर |

केंद्रीय माध्यमिक शिक्षण बोर्ड (सीबीएसई)चा इयत्ता दहावीचा निकाल बोर्डाच्या अधिकृत वेबसाईटवर जाहीर करण्यात आला. चौक येथील श्री स्वामिनारायण गुरकुल आंतरराष्ट्रीय सीबीएसई स्कूल शाळेचा निकाल 100 टक्के लागला आहे. यावेळी घवघवीत यश संपादन करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचे संस्थेच्यावतीने अभिनंदन करण्यात आले आहे.

यामध्ये विश्वतेज शेखर काटगावकरने 95.20 टक्के मिळवून प्रथम क्रमांक पटकावला आहे. तर, मोहित योगेश कठारिया 93.00 टक्के काढून द्वितीय क्रमांक, अनुपम शुक्ला याने 92.40 टक्के मिळवून तृतीय क्रमांक पटकावला आहे. इतर उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनी नेत्रदीपक यश संपादन करून उत्तीर्ण झाले आहेत.

Exit mobile version