| गोवे-कोलाड | वार्ताहार |
रोहा तालुक्यातील गोवे गावचे रहिवासी स्वप्नील वसंत वारकर यांचे बुधवार दि.27 डिसेंबर रोजी निधन झाले. मृत्यूसमयी त्यांचे वय 33 वर्षाचे होते. ते आंबेवाडी नाका येथे भाजी व्यवसाय करीत होते. त्यांच्या निधनाने त्यांच्या कुटूंबासह गोवे गावावर शोककळा पसरली आहे. त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी, एक मुलगा, आई, वडील, एक भाऊ, भावजय, दोन बहिणी, पुतणे व मोठा वारकर परिवार आहे. त्यांचे दशक्रिया विधी शुक्रवार दि.5 जानेवारी तर उत्तर कार्यविधी रविवार दि.7 जानेवारी 2024 रोजी त्याच्या गोवे येथील निवास्थानी होणार आहेत.
स्वप्नील वारकर यांचे निधन
