स्वप्नील बांदोडकर म्हणतोय देवा गणराया, केदार जोशींची निर्मिती ; नवं कोरं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला

खोपोली | संतोषी म्हात्रे |

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर श्री गणपती संस्थानचे विश्वस्त, शिक्षक मित्र केदार जोशी यांची निर्मिती असलेले देवा गणराया हे गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. स्वप्नील बांदोडकर यांनी गायलेल्या या गीताला चिनार महेश यांनी संगीतबद्ध केले असून संदीप माळवी यांनी हे गाणं लिहीलं आहे. आशीष नेवाळकर यांनी दिग्दर्शित केलेल्या या गाण्याला मोठा प्रतिसाद मिळतोय.

श्री गणपती संस्थांनचे विश्वस्त केदार जोशी सतत वेगवेगळे प्रयोग करत असतात. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर केदार जोशी यांनी देवा गणराया हे गाणं आणलं आहे. यूट्यूबवर प्रसारित झालेल्या या गाण्याला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळताना दिसतोय. स्वप्नील बांदोडकर यांनी गायलेल्या या गीताला चिनार महेश यांनी संगीतबद्ध केले असून संदीप माळवी यांनी लिहिलेलं गाणं आशीष नेवाळकर यांनी दिग्दर्शित केलं आहे. अभिनेता चिन्मय उदगीरकर आणि अभिनेत्री रूपाली भोसले यांच्या उत्कृष्ट अभिनयाने सजलेल्या या गाण्याचं गणेश भक्तांकडून स्वागत होत आहे. सुमन एन्टरटेनमेंटच्या बॅनरखाली केदार जोशी यांची ही पहिलीच निर्मिती असून या गणेशोत्सवात देवा गणराया वातावरण मंगलमय करण्याचा प्रयत्न करेल असा विश्वास निर्माते केदार जोशी यांनी दैनिक कृषीवल प्रतिनिधी शी बोलताना व्यक्त केला आहे.

Exit mobile version