स्वरा पुलेकर उद्या झी मराठीवर

‘आम्ही सारे खवय्ये’ मध्ये होणार सहभागी
| श्रीवर्धन | वार्ताहर |
श्रीवर्धनवासियांसाठी एक आनंदाची आणि अभिमानास्पद गोष्ट म्हणजे गुरुवार, दि. 30 मार्च रोजी रामनवमीच्या दिवशी झी मराठी या टीव्ही चॅनलवर दुपारी 2.30 वाजता प्रसारित होणार्‍या ‘आम्ही सारे खवय्ये’ या कार्यक्रमामध्ये श्रीवर्धनमधील गायिका स्वरा सचिन पुलेकर सहभागी होणार आहेत. अभिनेते संकर्षण कर्‍हाडे आणि ‘सारेगमप’ या प्रसिद्ध कार्यक्रमामधील विजेती लिटिल चॅम्प स्वरा जोशी या दोघांनी या कार्यक्रमाला होस्ट केलं आहे. तरी जास्तीत जास्त श्रीवर्धनवासियांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात येत आहे.

Exit mobile version