स्वराज, प्रथमेश यांची महाराष्ट्र क्रिकेट असो. चाचणी शिबिरासाठी निवड

| रायगड | क्रीडा प्रतिनिधी |

रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे दोन उदयोन्मुख खेळाडू स्वराज गोवारी व प्रथमेश मोरे या सोळा वर्षाखालील युवा खेळाडूंचा समावेश महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या संघ निवड चाचणी शिबिरामध्ये करण्यात आला आहे. स्वराज गोवारी पनवेल हा सलामीवीर फलंदाज आहे, तर प्रथमेश मोरे हा जलदगती गोलंदाज म्हणून ओळखला जातो. दोन्ही खेळाडूंनी महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या आंतरजिल्हा निवड चाचणी क्रिकेट स्पर्धेत रायगड जिल्ह्यासाठी खेळतांना उत्कृष्ट कामगिरी केली असून, त्यांच्या गुणवत्तेच्या आधारे त्यांची निवड पुढील होणाऱ्या संघ निवड चाचणी शिबिरामध्ये करण्यात आली आहे. स्वराज गोवारी हा पनवेल तालुक्यातील गुणवान खेळाडू असून, सुनिल सरगर क्रिकेट अकॅडमी येथे प्रशिक्षण घेत आहे. तर प्रथमेश मोरे हा माणगाव तालुक्यातील प्रतिभावान युवा जलदगती गोलंदाज असून, नयन शिंदे यांच्या अकॅडमी मध्ये प्रशिक्षण घेत आहे. दोन्ही खेळाडूंच्या प्रशिक्षकांने खेळाडूंच्या कामगिरीवर समाधान व आनंद व्यक्त केला आहे. रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अनिरुद्ध पाटील सचिव प्रदीप नाईक यांच्या सह सर्व पदाधिकारी व सदस्य यांनी दोन्ही खेळाडूंच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

Exit mobile version