आंतरराष्ट्रीय अ‍ॅबॅकस स्पर्धेत स्वराज दळवी प्रथम

| नागोठणे । वार्ताहर ।
माऊंट लिटरा झी स्कूलमधील इयत्ता तिसरीचा विद्यार्थी स्वराज महेश दळवी याने सोलापूरस्थित सीमाज् अकॅडमीतर्फे घेण्यात आलेल्या 20व्या आंतरराष्ट्रीय अ‍ॅबॅकस स्पर्धेत लेव्हल 2 मध्ये प्रथम क्रमांकाचे पारितोषिक पटकाविले आहे. देश-विदेशातून अनेक विद्यार्थी सहभागी झालेली ही स्पर्धा ऑनलाईन घेण्यात आली होती. बुद्धीचा कस लावणार्‍या व अत्यंत कठीण समजल्या जाणार्‍या या गणिती स्पर्धेत स्वराज याने लेव्हल 2 मध्ये प्रथम क्रमांक पटकावला. शालेय अभ्यासातही हुशार असणार्‍या स्वराज याने गेल्या तीन वर्षात झालेल्या वेगवेगळ्या राष्ट्रीय- आंतरराष्ट्रीय स्पर्धातूनही बाजी मारण्याची मारली असून त्याला राजश्री लर्निंग सेंटरच्या संचालिका राजश्री बोलके यांचे मार्गदर्शन लाभले.

Exit mobile version