स्वराज्य अभियानाला रायगडात प्रारंभ

| बोर्लीपंचतन । वार्ताहर |

स्वराज्य संघटनेच्या वतीने राज्यभर स्वराज्य अभियानांतर्गत गाव तिथे शाखा, घर तिथे स्वराज्य अभियान राबवण्यात येत असून रायगडात छत्रपती संभाजीराजे यांच्या नेतृत्वाखाली अभियानाला प्रारंभ झाला आहे.

जिल्ह्यातील स्वराज्य संघटनेच्या पहिल्या शाखेचे उद्घाटन नवीन पनवेल येथील तुलसी हाईट समोर सेक्टर 5 या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराज यांनी केले .पनवेल व पेण तालुक्यामध्ये एकूण पंचवीस शाखांचे उद्घाटन या दौर्‍यात करण्यात आले. या दौर्‍याप्रसंगी पेण खारपाडा येथील टोलनाक्याजवळ छावा क्रांतिवीर सेना रायगड विभागाच्या वतीने संस्थापक अध्यक्ष करण गायकर, जिल्हाध्यक्ष रोशन पवार यांनी छ.संभांजी राजे यांचे शाल व पुष्पगुच्छ देऊन भव्य स्वागत केले.यावेळी संघटनेच्यावतीने जिल्ह्यातील शिवकालीन किल्ल्यांचे व त्यावरील पाण्याच्या तलावांचे सुशोभिकरण, मुंबई गोवा महामार्गाची दुरवस्था व रखडलेले काम,पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न अशा विविध समस्यांचे लेखी निवेदन छ.संभाजी राजे यांना देण्यात आले त्याचबरोबर स्वराज्याचे सुराज्य पुनर्स्थापित करण्याचा कार्याला पाठींबा देण्याबरोबरच खांद्याला खांदा लावून काम करण्याचे आश्‍वासन दिले.

अठरा पगड जातींना एकत्र घेवून समाजकार्य करणार्‍या छावा क्रांतिवीर सेनेचे संस्थापक अध्यक्ष करण गायकर, जिल्हाध्यक्ष रोशन पवार यांच्या कार्याची छ.संभाजी राजे यांनी कौतूक करुन संघटनेला पुढील यशस्वी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी छावा क्रांतिविर सेनेचे जिल्हाउपाध्यक्ष जितेंद्र ठाकूर, संपर्क प्रमुख स्वप्नील घरत, संघटक राजेश रसाळ, खजिनदार नरेंद्र देशमुख, सरचिटणीस अनिकेत पाटील, शेतकरी अध्यक्ष विजय गावंड, सल्लागार दिलीप साळवी, प्रसिद्धी प्रमुख पूजा चव्हाण विविध तालुक्यांचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.

Exit mobile version