चित्रलेखा पाटील यांना मातृशोक

कार्यकर्त्यांसह वेगवेगळ्या क्षेत्रातील मंडळींनी घेतली सांत्वपनपर भेट

| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |

शेतकरी कामगार पक्षाच्या प्रवक्त्या तसेच कृषीवलच्या व्यवस्थापकीय संचालक चित्रलेखा पाटील यांच्या मातोश्री स्वाती सतीश टकले यांचे सोमवार, दि. 10 नोव्हेंबर रोजी पहाटेच्या सुमारास निधन झाले. निधनसमयी त्या 65 वर्षांच्या होत्या. त्यांच्या पश्चात पती, एक मुलगा, दोन मुली, जावई, नातवंडे असा परिवार आहे. चित्रलेखा पाटील नाशिक येथून अलिबाग निवासस्थानी आल्यावर शनिवारी अलिबागसह रायगड जिल्ह्यातील राजकीय, सामाजिक आदी विविध क्षेत्रातील मंडळींनी त्यांची सांत्वनपर भेट घेतली.

स्वाती टकले या नाशिकमधील रहिवासी होत्या. नाशिकमधील सोन्याचे प्रसिद्ध व्यापारी असलेल्या टकले ज्वेलर्सच्या त्या मालकीण होत्या. गृहिणीबरोबरच त्या एक उत्तम व्यावसायिक होत्या. सोमवारी पहाटेच्या सुमारास त्यांचे निधन झाले. त्याच दिवशी दुपारी साडेतीनच्या सुमारास नाशिक येथील अमरधाम स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

यावेळी शेकाप सरचिटणीस जयंत पाटील, रायगड जिल्हा परिषद माजी अध्यक्षा सुप्रिया पाटील, रायगड बाजारचे चेअरमन नृपाल पाटील आदींसह राजकीय, सामाजिक, व्यावसायिक क्षेत्रातील मंडळी, नातेवाईकांनी उपस्थित राहून त्यांना श्रद्धांजली अर्पण केली. स्वाती टकले यांच्या निधनाने टकले कुटुंबियांवर शोककळा पसरली आहे. दरम्यान, चित्रलेखा पाटील यांचे शेकापच्या असंख्य पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी नाशिक येथे प्रत्यक्ष भेटून सांत्वन केले होते. शनिवारी चित्रलेखा पाटील त्यांच्या अलिबाग-वेश्वी येथील निवासस्थानी आल्याचे समजताच विविध क्षेत्रातील मान्यवरांसह शेकापच्या असंख्य पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी सांत्वनपर भेट घेतली.

Exit mobile version