| खांब | वार्ताहर |
रोहा तालुक्यातील बाहे येथे गावदेवी क्रीडा मंडळ बाहे यांच्या वतीने व कोलाड विभाग कबड्डी असो. यांच्या सहयोगाने संपन्न झालेल्या विभागीय कबड्डी स्पर्धेत स्वयंभू वरसगाव संघाने अंतिम सामन्यात सर्वोत्तम कामगिरी करून विजेतेपदाचा बहुमान पटकावला. रा.जि. ओबीसी समन्वय समिती अध्यक्ष सुरेश मगर, रोहा तालुका कूणबी युवक मंडळ अध्यक्ष अनंत थिटे, उपाध्यक्ष शशिकांत कडू, ओबीसी समन्वय सल्लागार नवनीत डोलकर यांच्या हस्ते स्पर्धेचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी चंद्रकांत मगर, ग्रा.पं. सदस्य रवींद्र राऊत, नरेंद्र माळी, परशुराम माने, गाव कमिटी अध्यक्ष सुभाष माटल, राम देवकर, प्रदीप गोविलकर, कोलाड वि.कबड्डी असो. अध्यक्ष गणेश सानप, काशिनाथ थिटे आदी मान्यवर उपस्थित होते. तर, गोवे सरपंच महेंद्र पोटफोडे व उपसरपंच सूरज कचरे, भाजप युवा मोर्चा तालुका अध्यक्ष महेश ठाकूर, सुनील थिटे आदी मान्यवरांनी सदिच्छा भेट देऊन शुभेच्छा दिल्या.
या स्पर्धेच अंतिम सामन्यात द्वितीय क्र. सापाया वरसगाव, तर तृतीय व चतुर्थ क्रमांक भैरी देवी पहुर व भुवन या संघांनी पटकावला. स्पर्धेतील उत्कृष्ट चढाई प्रणित महाडिक (भुवन), उत्कृष्ट पक्कड नितेश सानप (सापाया वरसगाव), तर सामनावीर म्हणून राज अमृतकर (स्वयंभू वरसगाव) यांना उपस्थितीत मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी गावदेवी मंडळाच्या सर्व सदस्यांनी सहकार्य केले. या स्पर्धेचे समालोचन मनोज थिटे व आकाश भोईर यांनी केले.
कबड्डीत स्वयंभू वरसगाव अजिंक्य
