| मुंबई | प्रतिनिधी |
महाराष्ट्र विधान परिषदेवर बिनविरोध निवडून गेलेल्या महायुतीच्या पाचही सदस्यांनी आज (दि.21) सभागृहाचे सदस्य म्हणून शपथ घेतली. याबद्दलची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या एक्स अकाऊंटवरून दिली आहे.
भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेससह महायुतीच्या एकूण पाच नेत्यांचा शुक्रवारी शपथविधी पार पडला. यामध्ये भाजपचे दादाराव केचे, संजय केणेकर, संदीप जोशी, तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे संजय खोडके तर शिंदेंच्या शिवसेनेचे चंद्रकांत रघुवंशी यांचा शपथविधी आज विधानपरिषद सभागृहात झाला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महायुतीच्या सर्व नवनिर्वाचित सदस्यांची सभागृहाला ओळख करून दिली..विधान परिषदेची पोटनिवडणूक बिनविरोध झाली. पोटनिवडणुकीत ६ पैकी ५ उमेदवारांचे अर्ज वैध ठरले. तर एका अपक्ष उमेदवाराने भरलेला अर्ज बाद ठरला होता. अपक्ष उमेदवाराकडे आमदारांच्या पाठिंब्याचे पत्र आणि नोटरी नसल्याने त्याचा अर्ज अपात्र ठरविण्यात आला होता. दरम्यान, २० तारखेपर्यंत अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख होती. दरम्यान दादाराव केचे, संजय केणेकर, संदीप जोशी, चंद्रकांत रघुवंशी आणि संजय खोडके या महायुतीच्या उमेदवारांची बिनविरोध निवड झाली.