थंडीपासून बचावासाठी स्वेटरचे वाटप
| महाड | वार्ताहर |
गेल्या काही दिवसा बोचर्या थंडीची चाहूल सुरू असून, सकाळच्या पहारी शाळेला जाणार्या विद्यार्थ्यांचा थंडीपासून बचाव व्हावा यासाठी पुणे येथील आरहम सेवा युवा ग्रुप पुणेतर्फे रेवतळे केंद्रातील विद्यार्थ्यांना स्वेटर वाटप करत नवा आदर्श सर्वांसमोर ठेवला आहे.
दि. 26 डिसेंबर रोजी रेवतळे केंद्रातील सर्व शाळेतील विद्यार्थ्यांना स्वेटरचे वाटप करण्यात आले. यावेळी शाळा मुमुर्शी येथे आरहम सेवा युवा ग्रुपचे सदस्य निखील पवार, महेश पवार, धनराज सावंत, मुमुर्शी सरपंच संगीता पार्ट, रेवतळे केंद्रप्रमुख सुजितकुमार बनगर, शिक्षणप्रेमी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा, उपाध्यक्षा, सर्व सदस्य, ग्रामस्थांसह सर्व शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पवार यांनी केले.






