ईव्हीएम मशीन बंद करा

गावठाण विस्तार हक्क समितीचे पनवेल तहसीलदारांना निवेदन

| पनवेल | वार्ताहर |

20 नोव्हेंबर रोजी महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणूका पार पडल्या याची मतमोजणी 23 रोजी पूर्ण झाली. यावेळी राज्यात अनेक ठिकाणी ईव्हीएममध्ये तांत्रिक बिघाड पहावयास मिळाले. तसेच ईव्हीएम मशीनच्या बॅटर्‍या 99 टक्के चार्जिंग आढळून आल्या. त्यामुळे आमच्या मनात संशय येत असून, ईव्हीएम मशीनप्रमाणे मतदान घेणे म्हणजे लोकशाहीची हत्या असल्याचे सांगत पनवेलमधील गावठाण विस्तार हक्क समितीने पनवेलचे तहसीलदार विजय पाटील यांना निवेदन देत ईव्हीएम मशीन बंद करण्याची मागणी केली.

राज्यभरात अनेक मतदारसंघात ईव्हीएममधील मतदान आणि प्रत्यक्ष झालेल्या मतदानात तफावत दाखवली जात आहे. त्यात पनवेलचादेखील समावेश असल्याने ईव्हीएम शंका उपस्थित होत आहे. राज्यातील पुढील निवडणुका या बॅलेट पेपरवर घेण्यात यावे. जेणेकरून ईव्हीएम मशीनमध्ये होत असलेला घोळ थांबेल व पेपरवर मतदान झाल्यास जनतेसमोर चित्र स्पष्ट होईल, अशी मागणी समितीचे अध्यक्ष अनील ढवळे यांनी केली आहे. यावेळी जगदीश घरत, तेजस्वीनी घरत, सुधाकर लाड उपस्थित होते.

Exit mobile version