देशमुखांवर अटकेची टांगती तलवार

।मुंबई । प्रतिनिधी ।
राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या दोन्ही पीएना ईडीनं अटक केली आहे. सचिन वाझे आणि बार मालकांच्या जबाबवरुन कुंदन शिंदे आणि संजीव पालांडेला अटक करण्यात आली. दरम्यान, आता स्वत: अनिल देशमुख यांच्यावर अटकेची टांगती तलवार आहे. 4 कोटी 80 लाख रुपये बार मालकांनी सचिन वाझेला दिले. सचिन वाझेने हेच पैसे कुंदन शिंदेला दिले. आणि, कुंदन शिंदेने हे पैसे अनिल देशमुख यांना दिले, असा खुलासा सचिन वाझेनं त्याच्या जबाबात केला असल्याचं ईडीच्या सूत्रांनी सांगितलं आहे.

दुसरीकडे कुंदन शिंदे आणि संजीव पालांडे यांच्या रिमांड सुनावणीला मुंबई सत्र न्यायालयात सुरुवात झाली आहे. न्यायमूर्ती डॉ. यू. जे मोरे यांच्या न्यायालयात ही सुनावणी सुरु आहे. वकील शेखर जगताप संजीव पालांडे यांची बाजू मांडत असून, कुंदन शिंदे यांची बाजू वकील अभिजीत सावंत आणि मेहूल ठक्कर मांडताहेत. ईडीच्या बाजूने वकील सुनील गोंसावलीस बाजू मांडत असून, त्यांनी दोघांची 7 दिवसांची ईडी कोठडीची मागणी केली आहे. दोघांनाही 1 जुलैपर्यंत कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

Exit mobile version