| चिरनेर | प्रतिनिधी |
महामुंबई सेझसाठी संपादन करण्यात आलेल्या जमिनी शेतकर्यांना परत करण्याच्या निर्णयावर चार आठवड्यांत निर्णय देण्याच्या उच्च न्यायालयाच्या आदेशानंतरही मागील काही सुनावणी विविध कारणांमुळे जिल्हाधिकार्यांनी पुढे ढकलल्या आहेत. त्याविरोधात सेझग्रस्त शेतकर्यांनी 15 ऑक्टोबर रोजी लाक्षणिक उपोषणाचा इशारा दिला होता. त्याप्रमाणे आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करण्यात आले. या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी उरणचे माजी आमदार मनोहर भोईर, तसेच पेणचे प्रसाद भोईर उपस्थित होते. त्यांनी जिल्हाधिकारी यांना शेतकर्यांच्यावतीने निवेदन दिले. जिल्हाधिकारी यांनी लवकरात लवकर निकाल द्यावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले आले. सदरचा निकाल देताना त्यास आचारसंहितेची काहीच बाधा येणार नाही, असेदेखील सांगितले. या उपोषणाला पेण, पनवेल, उरण तालुक्यातील सुमारे 200 ते 250 शेतकरी उपस्थित होते.