| सुधागड-पाली | वार्ताहर |
पाली नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदी प्रणाली पाटील शेळके या विजयी झाल्या. गीता पालरेचा यांनी नगराध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या नगराध्यक्षपदासाठी बुधवारी निवडणूक घेण्यात आली.रोह्याचे प्रांत विठ्ठल इनामदार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या निवडणुकीत प्रणाली पाटील यांना 10 तर प्रतिस्पर्धी उमेदवार आरिफ मणियार यांना चार मते मिळाली. निवडून आल्यानंतर नगराध्यक्षा प्रणाली पाटील-शेळके यांनी पाली शहराच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असून लवकर पालीचे प्रश्न मार्गी कसे लागतील यादृष्टीने वाटचाल करणार आहे. विकासासाठी हे पाऊल उचललेले असून पालीचा विकास हेच एकमेव ध्येय आहे,असे त्या म्हणाल्या.
प्रणाली पाटील-शेळके पालीच्या नगराध्यक्षपदी
