। माणगाव । वार्ताहर ।
अमरावती येथे टिम झेनिथद्वारा 7 मे रोजी आयोजित करण्यात आलेल्या द फेम महाराष्ट्र 2022 माँडलींग व डान्स स्पर्धेत माणगाव तालुक्यातील गोरेगावची प्रणाली लक्षमण खांबे ही मिस महाराष्ट्र 2022 ची विजेती ठरली. आता तिची शिमला येथे होणार्या मिस इंडिया 2022 स्पर्धेकरीता महाराष्ट्रातून निवड झाली आहे. तिने मिळविलेल्या या यशाबद्दल तिचे गोरेगावसह माणगाव तालुक्यात सर्वत्र कौतुक व अभिनंदन होत आहे. अमरावती येथे झालेल्या या स्पर्धेसाठी मिसेस इंडिया स्मिता खोबरागडे, डान्सर व कोरीओग्राफर अमोल जाधव, शितल बघेल, प्रिती जाधव आदिंनी परीक्षक म्हणून काम पाहिले. यावेळी पुजा देशमुख यांनी उपस्थितांना बहुमोल असे मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाला फॅशन कोरीओग्राफर रुपेश चव्हाण, प्रकाश मेश्राम , अजित बोरकर आदी मान्यवर उपस्थित होते.