टी-20 विश्‍वचषक स्पर्धा

वंदे मातरम राष्ट्रीय गीताचा व्हिडीओ प्रोमो

| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |

सध्या आयपीएलचा थरार सुरु आहे. आयपीएलनंतर लगेचच आयसीसी टी-20 विश्‍वचषक 2024 होणार आहे. 1 जूनला अमेरिका आणि कॅनडा यांच्यात पहिला सामना होणार आहे. भारतीय संघाचा पहिला सामना आयर्लंडविरुद्ध रंगणार आहे. हा सामना 5 जून रोजी न्यूयॉर्कमध्ये होईल. तर भारताचा दुसरा सामना पाकिस्तानसोबत होणार आहे. टी-20 विश्‍वचषकाच्या पार्श्‍वभूमीवर स्टार स्पोर्ट्सने एक व्हिडीओ प्रोमो प्रसिद्ध केला आहे. या व्हिडीओ वंदे मातरम हे राष्ट्रीय गीत आहे. यामध्ये रोहित शर्मा, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा दिसत आहे. हा व्हिडीओ प्रोमो सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. तसेच हा व्हिडीओ बघून भारतीयांच्या अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही.

10 जणांची नावं जवळपास निश्‍चित
रोहित शर्मा, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, अर्शगीप सिंग, कुलदीप यादव, रवींद्र जाडेजा, हार्दिक पांड्या, ऋषभ पंत
टी 20 विश्‍वचषकासाठी भारताचे संभाव्य 15 शिलेदार 
रोहित शर्मा, विराट कोहली, शुभमन गिल, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या, ऋषभ पंत, संजू सॅमसन/केएल राहुल, रिंकू सिंह/शिवम दुबे, रवींद्र जडेजा,अक्षर पटेल, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल/रवि बिश्‍नोई, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंह
विश्‍वचषकासाठी पात्र ठरलेले 20 संघ
अमेरिका, वेस्ट इंडिज, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, भारत, नेदरलँड्स, न्यूझीलंड, पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका, अफगाणिस्तान, बांगलादेश, आयर्लंड, स्कॉटलंड, पापुआ न्यू गिनी, कॅनडा, नेपाळ, ओमान, नामिबिया, युगांडा
गटवारी
अ - भारत, पाकिस्तान, आयर्लंड, कॅनडा, अमेरिका
ब - इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, नामिबिया, स्कॉटलंड, ओमान
क - न्यूझीलंड, वेस्ट इंडिज, अफगाणिस्तान, युगांडा, पापुआ न्यू गिनी
ड - दक्षिण आफ्रिका, श्रीलंका, बांगलादेश, नेदरलँड्स, नेपाळ
भारतीय संघाचे वेळापत्रक
5 जून - वि. आयर्लंड, न्यू यॉर्क
9 जून - वि. पाकिस्तान. न्यू यॉर्क
12 जून - वि. अमेरिका, न्यू यॉर्क
15 जून - वि. कॅनडा, फ्लोरिडा
Exit mobile version