। वेणगाव । वार्ताहर ।
जय हनुमान क्रीडामंडळ, भूतीवली आयोजित अक्षय स्मृती चषक 2021 क्रिकेटचे सामने आयोजित करण्यात आले होते. या सामन्यात प्रथम पारितोषिक विजेता मानकरी ताडोबा कळंब क्रिकेट संघ ठरला.
बेकरे गाव येथील चेंडीचा माळ या ग्राऊंडवर टेनिस क्रिकेटचे सामने आयोजित करण्यात आले होते. या स्पर्धेमध्ये 32 संघांनी सहभाग घेतला होता.सदर क्रिकेटचे सामने मर्यादित षटकांचे ठेवण्यात आले होते. या स्पर्धेत प्रथम पारितोषिक 40 हजार रूपये व चषक ताडोबा कळंब क्रिकेट संघाने पटकावला, तर द्वितीय पारितोषिक 20 हजार रूपये व चषक शेळू येथील गुरू इलेव्हन क्रिकेट संघाला व तृतीय पारितोषिक 10 हजार रूपये व चषक सतसंग आपटे वाडी क्रिकेट संघ सिरगाव बदलापूर, चतुर्थ पारितोषिक 10 रूपये व चषक जय हनुमान क्रिकेट संघ खालापूर यांना पटकाविला.
सदर सामने यशस्वी करण्यासाठीं गणेश कोंडे, शंकर कोंडे, प्रवीण पवार, लहू पवार, महेश कदम, अमीर पवार, लक्षुमन कोंडे, सुनील कोंडे, निलेश कदम, हरीश कदम, लक्षुमन पडवळ, सुरेश मोरे, कृनाल ठाकरे, सुरेश कोंडे आदींनी अति मेहनत घेतली.