| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
अलिबाग तालुक्यातील चिंचोटी येथील तरुणीवरील अतिप्रसंग करण्याच्या प्रयत्नानंतर शेकापचे सरचिटणीस आ. जयंत पाटील यांनी देखील पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशनच्या माध्यमातून सभागृहाचे लक्ष वेधले. गेल कंपनीच्या कर्मचाऱ्यांवर व कंत्राटदारांवर कारवाई करण्यासह परप्रांतीयांसाठी राज्य शासनाकडून ठराविक नियमावली तयार करावी, अशी मागणी आ. जयंत पाटील यांनी केली.
आज विधानपरिषदेत पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशनच्या माध्यमातून अलिबाग गावातील चिंचोटी गावच्या रस्त्यावर (दि.17) रात्रीच्या वेळी कामावरून जाणाऱ्या मुलीवर बलात्कार करण्याचा प्रकार अतिशय गंभीर असल्याची बाब आ.जयंत पाटील यांनी सभागृहासमोर मांडली.
हा सर्व प्रकार परप्रांतीयांकडून झाल्याची बाब तपासात पुढे आली आहे. त्यामुळे गेल कंपनीच्या कर्मचाऱ्यांवर व कंत्राटदारांवर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली. तसेच या परिसरात परप्रांतीयांसाठी राज्य शासनाकडून ठराविक नियमावली तयार करावी, अशीही मागणी त्यांनी केली.