| नवीन पनवेल | प्रतिनिधी |
खारघर शहरातील कोपरा गावामधील रेशनिंगच्या दुकानावर कारवाई करण्याची मागणी सिद्धेश विष्णू ठाकूर यांनी पुरवठा अधिकारी पनवेल यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. खारघर सेक्टर 10, कोपरा गाव येथे रेशनिंगचे दुकान असून, त्या ठिकाणी रेशनिंगच्या धान्याची काळ्या बाजारात विक्री होत असल्याचा आरोप सिद्धेश ठाकूर यांनी केला आहे. पनवेल शहर आणि तालुक्यात एकूण रेशनिंगचे 199 दुकाने आहेत. सर्वच ठिकाणी अशा प्रकारे रेशनिंगच्या धान्याची काळा बाजारात विक्री होत असल्याचे यानिमित्ताने समोर आले आहे. मात्र, पुरवठा अधिकारी कारवाई करत नसल्याने या दुकानदारांचे फावत आहे. अशाप्रकारे धान्य काळ्या बाजारात विकणे कायद्याने गुन्हा आहे. त्यामुळे तहसीलदारांनी स्वतः लक्ष देऊन अशा दुकानदारांवर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.






