‘अनधिकृत डम्पिंग ग्राऊंडवर कारवाई करा’

। नवीन पनवेल । वार्ताहर ।

पनवेल रेल्वे स्टेशनजवळ असणार्‍या अनधिकृत डम्पिंग ग्राऊंडवर कारवाईची मागणी मनसेच्या महिला जिल्हाध्यक्ष अदिती सोनार यांच्यातर्फे करण्यात आली आहे.

डम्पिंग ग्राऊंडमुळे परिसरात प्रचंड दुर्गंधी पसरली आहे. या ठिकाणी शहरातील घनकचरा टाकण्यात येत आहे. लोकलने प्रवास करण्यासाठी हजारो प्रवासी येजा करतात. या डम्पिंग ग्राऊंडच्या दुर्गंधीमुळे त्यांना नाकावर रुमाल ठेवून जावे लागत आहे. या डंपिंग ग्राऊंडमुळे परिसरात दुर्गंधीचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे रोगराईचे प्रमाण वाढत चालले आहे. या सर्वांचा त्रास परिसरातील सर्वसामान्य नागरिकांना होत आहे. अशा प्रकारे अनधिकृतरित्या चालू असलेल्या डम्पिंग ग्राऊंडवर कारवाई करावी अन्यथा आंदोलन करण्यात येईल, असा इशारा मनसेच्या वतीने देण्यात आला आहे. यावेळी अदिती सोनार, प्रतीक वैद्य, प्रीती खानविलकर, गणेश सरवणकर आदी उपस्थित होते.

Exit mobile version