अवैध ब्लास्टिंगवर कारवाई करा; मनसेनेकडून सागरी पोलीस ठाण्याला निवेदन

। उरण । वार्ताहर ।
उलवे नोेड येथे नव्याने विकसित होत असताना सेक्टर 25, 26, 29 येथे मोठ्या प्रमाणात अवैधरित्या ब्लास्टिंग होत आहे. या ब्लास्टिंग कामांचा शेजारील परिसरातील अबालवृद्धांसह परिसरातील नवीन बांधकामांना त्रास होत आहे. तरी या ब्लास्टिंगवर कारवाई करावी, अशी मागणी मनसेतर्फे सागरी पोलिसांकडे करण्यात आली आहे.
याबाबत उलवे मनसेतर्फे सिडको तसेच सागरी पोलीस ठाण्याला निवेदन देऊनसुद्धा येथील ब्लास्टिंग चालू आहे. तरी वरिष्ठ अधिकार्‍यांनी या बाबींकडे जातीने लक्ष घालून या अशा अवैध ब्लास्टिंग करणार्‍यांवर कारवाई करावी, अशी मागणी उलवेवासियांकडून होत आहे. सदर निवेदन उलवे मनसेतर्फे शहर अध्यक्ष राहुल पाटील, सचिव मनोज कोळी, गणेश पुरी, शाखाध्यक्ष चेतन कोळी यांच्या सहीने देण्यात आले आहे

Exit mobile version