नागरिकांना महावितरणाचे आवाहन
। रसायनी । वार्ताहर ।
महावितरणाकडून योजनेचा लाभ नागरिकांनी घ्यावे असे सर्वत्र आवाहन होत आहे. वासांबे ग्रुप ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत गुरुवारी (दि.12) प्रधानमंत्री सुर्यघर मोफत वीज योजनेची माहिती देण्यात आली. ही माहिती महावितरण पनवेल ग्रामीण उपकार्यकारी अभियंता राख, गुण नियंत्रण विभागाचे सहाय्यक अभियंता प्रविण म्हात्रे, मोहोपाडा विजवितरण सहाय्यक अभियंता लक्ष्मीकांत गलांडे यांनी दिली. तसेच, ही योजना नागरिकांपर्यंत पोहचण्यासाठी वासांबे ग्रामपंचायतीकडून जनजागृती व्हावी, असे आवाहन केले.
तसेच, ही योजना घरगुती असून छतावरील सौर उर्जा दरमहा निर्मितीत एक किलो वॅटमध्ये 120 युनिट निर्मिती होते. यासाठी 5 हजार लोकसंख्या असलेल्या गावांना 1 कोटी रुपयांचे केंद्रीय अर्थसहाय्य अनुदान मिळणार आहे. यावेळी सरपंच उमा मुंढे, उपसरपंच भुषण पारंगे, ग्रामविकास अधिकारी वैभव पाटील, सर्व ग्रामपंचायत सदस्य, कर्मचारी व नागरिक उपस्थित होते.