एक निवडणुक मत पत्रिकेवर घ्या;उद्धव ठाकरेंची मागणी

16 डिसेंबरला अदानीच्या कार्यालयावर मोर्चा
| मुंबई | प्रतिनिधी |
काही दिवसांआधीच पाच राज्यातील विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला आहे. या निवडणुकीत भाजपाला तीन राज्यात भरभरून यश मिळाले. दम असेल, तर पहिल्यांदा मुंबई महानगरपालिकेची निवडणूक घ्या आणि एक निवडणूक मत पत्रिकेवर घेऊन दाखवा, असे आवाहन शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपला दिले आहे.

सरकारला आणि अदानीला जाब विचारण्यासाठी 16 डिसेंबरला धारवीहून अदानीच्या कार्यालायवर शिवसेनेचा मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी दिली.

धारावीमध्ये राहणाऱ्या नागरिकांचे त्यांच्या उद्योगासाठी तिथेच स्थानांतर होणे गरजेच आहे. 400 ते 500 फुटांची जागा त्यांना मिळायला पाहीजे. 80 ते 90 हजार झोपड्या अद्याप पात्र-अपात्रतेच्या सीमेवर आहेत. याबाबत आदानी काय भूमिका घेणार असा सवाल ठाकरे यांनी केला.

सरकार उद्योगपतीला मदत करत आहे. पिढ्यान्‌‍ पिढ्या धारावीवासीय त्या ठिकाणी राहत आहेत त्याच ठिकाणी त्यांना राहायला मिळायला पाहीजे, यासोबतच पोलीस, सफाई कर्मचारी यांना देखील राहायला संधी मिळणे गरजेचे आहे.

टीडीआर सरकारने विकत घेतले पाहीजे आणि त्यांनीच धारावीचा विकास केला पाहीजे असेही ते म्हणाले. अदाणी यांचे भले कसे होईल, असे सरकारचे नियोजन आहे. मुंबईतील धारावीचा विकास झालाच पाहिजे, अशी शिवसेनेची भूमिका आहे. धारावी विकासांच्या कामाबद्दल संशय येत आहे. धारावीच्या गलिच्छ वस्तीला सोन्याचा भाव आला आहे. तेथील व्यवसायिकांना देखील जागा मिळाल्या पाहिजेत. विकास कामांमुळे मुंबईकरांचा श्वास घुसमटला आहे. नियोजन शून्य कामांमुळे मुंबईत मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत आहे. सरकार केवळ कंत्राट काढत आहे. हे ठेकदार सरकार आहे, असा घणाघात त्यांनी केला.

अभ्युदय नगर बांद्रा रिक्लेमेशन हे देखील अदानीला देण्यात येणार असल्याची माहिती मिळली आहे. केवळ अदानीसाठी सगळे करत आहेत, त्यामुळेच 16 तारखेला शिवसेनचा भव्य मोर्चा अदानीच्या कार्यालयावर काढण्यात येणार आहे.

Exit mobile version