खरात, चाकणकरांवर कठोर कारवाई करा

उरणमध्ये काँग्रेसचे आंदोलन

| उरण | प्रतिनिधी |

अनेक महिलांवर अत्याचार करून त्यांचे शोषण करणाऱ्या अशोक खरात याच्यासोबत महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांचे अनेक व्हिडिओ समोर आले आहेत. त्यामुळे लवकरात लवकर रूपाली चाकणकरांना अटक करून सखोल चौकशी करण्यात यावी व अशोक खरातसारख्या लिंग पिसाटला कठोर शिक्षा व्हावी या मागणीसाठी महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसच्या अध्यक्षा संध्या सव्वालाखे यांच्या आदेशानुसार तसेच रायगड जिल्हा अध्यक्ष महेंद्र घरत यांच्या मार्गदर्शनाखाली रायगड महिला काँग्रेसच्या वतीने उरण मध्ये आंदोलन करण्यात आले.

याप्रसंगी रायगड जिल्हा काँग्रेस महिला अध्यक्षा रेखा घरत, निर्मला पाटील, अश्रया शिवकर, सोनाली पाटील, मनिषा पाटील, जयश्री पाटील, प्रमीला पाटील, तुलसा पंडीत, गुलाब पाटील, आशा भोईर, सविता पाटील, ज्योती मढवी, सुमन मढवी, सुलेखा पाटील, चंपा पाटील, पार्वती पंडीत, वर्षा पाटील, इंदुबाई पाटील, जनाबाई पाटील, गुनीबाई पाटील उपस्थित होत्या.

Exit mobile version