अभिनेत्री पूजा महेंद्र यांची उपस्थिती
। उरण । वार्ताहर ।
उलवे नोड वासीयांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असणारा पक्ष शेतकरी कामगार पक्ष आणि पक्षाच्या माध्यमातून त्यांची सेवा करणारे मुंबई कृषि उत्पन्न बाजार समितीचे संचालक राजेंद्र पाटील, माजी सरपंच तथा उलवे नोड शेकाप अध्यक्ष प्रशांत पाटील, सरपंच पुजा पाटील यांच्या वतीने महिलांसाठी अभिनेत्री पूजा महेंद्र यांच्या खास उपस्थितीत हळदीकुंकू समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाचे उद्घाटन अभिनेत्री पूजा महेंद्र यांच्या हस्ते झाले. सदर कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती आ.बाळाराम पाटील, माजी नगराध्यक्ष जे. एम. म्हात्रे, माजी तालुका चिटणीस नारायण शेठ घरत, जेष्ठ पत्रकार माधवराव पाटील, तालुका चिटणीस राजेश केणी, जिल्हा परिषद सदस्य विलास फडके, रवींद्र पाटील, महादेव पाटील, विश्वनाथ पाटील, काशिनाथ पाटील अध्यक्ष पनवेल विधान सभा, गोपाळ भगत, देवा पाटील, अनुराथा ठोकळ, रामदास नाईक विभागीय चिटणीस, तैमुर पाटील माजी सरपंच मोरावे, समीर पाटील, अमित घरत, गणेश पाटील माजी उपसरपंच, कुलदीप तिवारी उपाध्यक्ष शेकाप उलवे नोड, नीता दबडे अध्यक्षा सांस्कृतिक विभाग, केतन शेट्ये अध्यक्ष लाल बिग्रेड, सतिश पाटील अध्यक्ष सेक्टर 3, सुरज निकम अध्यक्ष सेक्टर 2, राकेश करंगुटकर अध्यक्ष सेक्टर 20, राजू पवार अध्यक्ष सेक्टर 5, अनिता यादव महिला अध्यक्षा सेक्टर 20, विमल झेले महिला अध्यक्षा सेक्टर 21 आदी मान्यवर उपस्थित होते.