राष्ट्रीय उपलब्धी सर्वेक्षण दिवाळी सुट्टीनंतर घ्या

आ.बाळाराम पाटील यांची मागणी
अलिबाग । शहर प्रतिनिधी ।
केंद्रीय माध्यमिक शिक्षण बोर्ड द्वारा राष्ट्रीय उपलब्धी सर्वेक्षण दिवाळी सुट्टीनंतरच घेतले जावे,अशी मागणी शेकाप आम.बाळाराम पाटील यांनी केली आहे.
12 नोव्हेंबरला एकाच दिवशी देशातील 733 जिल्ह्यात हे सर्वेक्षण केले जाणार आहे. परंतु दि. 1 नोव्हेंबर ते 20 नोव्हेंबर या कालावधीत संपूर्ण महाराष्ट्रातील शाळांना दिवाळीची सुट्टी असल्यामुळे दिवाळी सण साजरा करण्यासाठी विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आपल्या गावी जातात. ही बाब लक्षात घेऊन शेकाप आ. बाळाराम पाटील यांनी केंद्रीय माध्यमिक शिक्षण बोर्डाकडे पत्र देऊन मागणी केली आहे की राष्ट्रीय उपलब्धी सर्वेक्षण दिवाळी सुट्टीनंतर घेण्यात यावे. असे सुचित केलेले आहे,दिवाळी सुट्टीनंतर राष्ट्रीय उपलब्धी सर्वेक्षण नियोजित केल्यास शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी या राष्ट्र विधायक कार्यात सक्रिय सहभाग घेईल आणि सदर सर्वेक्षण यशस्वीरीत्या पूर्ण करेल,असा विश्‍वासही त्यांनी या पत्रातून व्यक्त केला आहे.

Exit mobile version