| तळा | वार्ताहर |
तळा तालुका पावसाळी क्रीडा स्पर्धेची सांगता उत्साही वातावरणात पार पडली. या स्पर्धेत तळा हायस्कूल आणि बंदरकाठा हायस्कूल यांचे वर्चस्व सिद्ध केले.
दिनांक 10, 11, 12 नोव्हेंबर असे तीन दिवस सांघिक व वैयक्तिक क्रीडा स्पर्धा तळा हायस्कूलच्या क्रीडांगणावर संपन्न होत असताना तालुक्यातील हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज यांनी सहभाग नोंदविला होता. या स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ तळे तालुका पावसाळी क्रीडा स्पर्धेचे अध्यक्ष तथा तहसिलदार मा. अण्णाप्पा कनशेट्टी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. याप्रसंगी तळा पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकारी सुरेखा तांबट, संस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत रोडे, उपाध्यक्ष पुरुषोत्तम मुळे, चेअरमन महेंद्र कजबजे, डॉ. प्र. म. जोशी प्रशालेचे चेअरमन श्रीराम कजबजे, कार्यकारिणी सदस्य दिपक कोटिया, क्रीडा समन्वय अरुण कुळपे, कसबे सर, विजय पवार, मुख्याध्यापक धुमाळ सर इत्यादी व्यासपीठावर उपस्थित होते.
या क्रीडा स्पर्धेत 14, 17, 19 वयोगटातील मुलांचा व मुलींचा सहभाग होता. यामध्ये 14 वर्षे वयोगट मुले कबड्डी प्रथम तळा हायस्कूल, द्वितीय बोरघर हायस्कूल, मुली कबड्डी प्रथम तळा हायस्कूल, द्वितीय पिटसई हायस्कूल, 17 वर्षे मुले कबड्डी प्रथम तळा हायस्कूल, द्वितीय पिटसई हायस्कूल, मुली कबड्डी प्रथम बोरघर हायस्कूल, द्वितीय तळा हायस्कूल, 14 वर्षे खो-खो मुले प्रथम बंदरकाठा हायस्कूल, द्वितीय तळा हायस्कूल, 14 वर्षे मुली खो-खो प्रथम बंदरकाठा हायस्कूल, द्वितीय तळा हायस्कूल, 17 वर्षे मुले खो-खो प्रथम बंदरकाठा हायस्कूल, द्वितीय पिठसई हायस्कूल, 17 वर्षे मुली खो-खो प्रथम बंदरकाठा हायस्कूल, द्वितीय तळा हायस्कूल, 19 वर्षे मुले कबड्डी, खो-खो प्रथम तळा ज्युनिअर कॉलेज, 19 वर्षे मुली कबड्डी, खो-खो प्रथम तळा ज्युनिअर कॉलेज, यासह 100, 200, 400, 600 मीटर धावणे, रिले, लांब उडी, उंच उडी, थाळीफेक, गोळाफेक, भालाफेक या स्पर्धा देखील घेण्यात आल्या होत्या, यामध्ये पन्हेळी, उसर, मांदाड, महागाव, एस एस निकम, बोरघर, मजगाव, पिटसई, तळा इत्यादी हायस्कूल मधील मुलांनी, मुलींनी 14 वर्षे, 17 वर्षे व 19 वर्षे वयोगटात प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांक मिळविला. उपस्थित मान्यवरांचे हस्ते विजय खेळाडूंना मेडल, सन्मानचिन्ह, सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
पंच म्हणून अरुण कुळपे, विजय पवार, प्रकाश ढाकणे विनोद लाड, एकनाथ पिचड, नानासाहेब मचे, सचिन कांबळे, संजय पालवे, सौ भोईर मॅडम, सौ माधवी पाटील, सौ मोहिते मॅडम, सौ मांडवकर मॅडम, विठ्ठल सर्जे, वारगुडे पोपटराव कसबे, सुहास भोईर, जे पी बागुल, विनायक सुतार इत्यादी शिक्षकांनी पंच म्हणून उत्तम काम केले. स्पर्धेचे समालोचन व सूत्रसंचालन, आभार प्रदर्शन विजय पवार यांनी केले. महेंद्र कजबजे (चेअरमन) व तळे विभाग शिक्षण प्रसारक मंडळाच्या पदाधिकारी यांनी स्पर्धा यशस्वी होण्यासाठी परिश्रम घेतले