तळा नगरपंचायत चार जागांचे आरक्षण जाहीर

। तळा । वार्ताहर ।
तळा नगरपंचायतीची चार जागांसाठी सुधारीत आरक्षणाची सोडत गुरुवारी (दि.23) काढण्यात आली. यामध्ये दोन जागा या सर्वसाधारण महिलांसाठी राखीव आहेत तर दोन जागा या सर्वसाधारण म्हणून जाहीर करण्यात आल्या आहेत. तळा नगरपंचायत सदस्यपदाची चार जागांसाठी सुधारित आरक्षण सोडत डॉ.नानासाहेब धर्माधिकारी सभागृह पंचायत समिती तळा येथे पेण उपविभागीय अधिकारी विठ्ठल इनामदार, तहसीलदार आण्णापा कनशेट्टी, मुख्याधिकारी माधुरी मडके यांचे नियंत्रणाखाली काढण्यात आली आहे. सुधारीत आरक्षण सोडतीत प्रभाग 1 सर्वसाधारण महिला, प्रभाग 3 सर्वसाधारणमहिला, प्रभाग 10 सर्वसाधारण, प्रभाग 14 सर्वसाधारण अशी आरक्षणे पडली आहेत. नव्याने काढण्यात आलेल्या या आरक्षण सोडतीत महिलांना संधी देण्यात आली असून या चार जागांसाठी 18 जानेवारी रोजी मतदान पार पडणार आहे.

Exit mobile version