इच्छुक उमेदवार सक्रिय
। खोपोली । प्रतिनिधी ।
खोपोली नगरपालिकेच्या 31 जागांसाठी पालिकेच्या सभागृहात आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली. 31 पैकी अनुसूचीत जाती प्रवर्गासाठी 3, अनुसूचीत जमातीसाठी 1, महिलांसाठी 14 जागा आरक्षित झाल्या आहेत. तर 13 जागांवर सर्वसाधारण उमेदवार आपल भवितव्य आजमवणार आहेत. मेट्रो सेंटर पनवेल 1 भू संपादन अधिकारी दत्तात्रय नवले यांच्या अध्यक्षतेखाली मुख्याधिकारी अनुप दुरे यांनी ही सोडत जाहीर केली.
खोपोली नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत. प्रभाग रचना जाहीर झाल्यानंतर सोमवारी पालिकेच्या सभागृहात मुख्याधिकारी अनुप दुरे यांच्या उपस्थितीत 31 जागांसाठी आरक्षण जाहीर करण्यात आले. 31 पैकी अनुसूचीत जाती प्रवर्गासाठी 3 पैकी 2 महिला, अनुसूचीत जमातीसाठी 1, महिलांसाठी 14 जागा तर 13 जागा सर्वसाधारण म्हणून आरक्षित झाल्या आहेत. खोपोली नगरपालिकेची निवडणूक सर्वच राजकीय पक्षांसाठी प्रतिष्ठेची असते. त्यामुळे आरक्षण सोडतीसाठी मा.ज्येष्ठ नगरसेवक मोहन औसरमल, सुनिल पाटील, किशोर पानसरे, बेबीशेठ सँम्युअल, केटीएसपी मंडळाचे अध्यक्ष संतोष जंगम, मा.नगरसेवक अविनाश तावडे, राजू गायकवाड, अमोल जाधव, कय्युम पाटील, शिवसेनेचे हरिश काळे,वंचित बहुजन आघाडी शहर अध्यक्ष दिपक गायकवाड, काँग्रेसचे इटक अध्यक्ष अरूण गायकवाड, शेकापक्षाचे राजू अभाणी, मनसेचे शहर अध्यक्ष अनिल मिंडे, भाजपाचे शहर चिटणीस हेमंत नांदे, राहुल जाधव, आप पक्षाचे पादाधिकारी यांच्यासह विविध राजकीय पक्षांच्या प्रमुख नेत्यांसह कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती.
या सोडतीत प्रभाग क्र.1 अ सर्वसाधारण महिला तर ब सर्वसाधारण, प्रभाग क्रमांक 2 अ अनुसूचित जाती महिला तर ब सर्वसाधरण, प्रभाग क्रमांक 3 अ अनुसूचित जाती तर ब सर्वसाधारण महिला, प्रभाग क्रमांक 4 अ सर्वसाधारण महिला तर ब साधारण, प्रभाग क्रमांक 5 अ अनुसूचित जाती महिला तर ब सर्वसाधारण, प्रभाग क्रमांक 6 अ सर्वसाधारण महिला, सर्वसाधारण, प्रभाग क्रमांक 7 अ सर्वसाधारण महिला तर ब सर्वसाधारण, प्रभाग क्रमांक 8 अ सर्वसाधारण महिला तर ब सर्वसाधारण, प्रभाग क्रमांक 9 अ अनुसूचित जाती तर ब सर्वसाधारण महिला, क सर्वसाधारण महिला, प्रभाग क्रमांक 10 अ सर्वसाधारण महिला तर ब सर्व साधारण, प्रभाग क्रमांक 11 अ सर्वसाधारण महिला तर ब सर्वसाधरण, प्रभाग क्रमांक 12 अ सर्वसाधारण महिला तर ब सर्वसाधरण, प्रभाग क्रमांक 13 अ सर्वसाधारण महिला तर ब सर्वसाधरण, प्रभाग क्रमांक 14 अ सर्वसाधारण महिला तर ब सर्वसाधारण, प्रभाग क्रमांक 15 अ सर्वसाधारण महिला तर ब सर्वसाधारण आरक्षण जाहीर झाले आहे.
या जाहीर झालेल्या आरक्षणावर आक्षेप असतील तर 15 ते 21 जून या दरम्यान हरकती नोंदवता येणार आहेत. दरम्यान आरक्षण जाहीर झाल्याने सर्वच राजकीय पक्ष आणि इच्छुक उमेदवार तयारीला लागले आहेत.