नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
अफगाणिस्तामध्ये तालिबानची सत्ता प्रस्थापित झाली आहे. तालिबानच्या राजकीय कार्यालयाचे प्रमुख मुल्ला बरादर अफगाणिस्तानमधील नवीन सरकारचे नेतृत्व करतील. तालिबानचे दिवंगत संस्थापक मुल्ला उमर यांचे पुत्र मुल्ला मोहम्मद याकूब आणि शेर मोहम्मद अब्बास स्टेनिकझाई हे सरकारमध्ये वरिष्ठ पदावर असतील. तालिबानच्या सह-संस्थापकांपैकी एक मुल्ला अब्दुल गनी बरदारला 2010 मध्ये दक्षिण पाकिस्तानच्या कराची शहरात सुरक्षा दलांनी पकडलं होतं आणि त्यानंतर 2018 मध्ये सोडून दिलं.