नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या सरकारला सर्वोच्च न्यायालयाकडून आणखी एक धक्का बसला आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगाशी (यूपीएससी) सल्लामसलत न करता पोलीस महासंचालक नियुक्त करण्याच्या पश्चिम बंगाल सरकारच्या याचिकेला सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी (3 सप्टेंबर) नकार दिला आहे. यावेळी न्यायालयाने असं म्हटलं आहे की, हा कायद्याचा गैरवापर आहे. न्यायमूर्ती नागेश्वर राव, न्यायमूर्ती बी.आर. गवई आणि न्यायमूर्ती बी.व्ही. नागरथना यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी झाली.