मुंबई | वृत्तसंस्था |
सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमी या संस्थेने देशाचा बेरोजगारीचा आकडा नुकताच प्रसिद्ध केला असून, सुमारे साडे आठ टक्क्यांनी बेरोजगारी वाढल्याचा धक्कादायक खुलासा करण्यात आला आहे. ऑगस्ट महिन्यात साडेपंधरा लाख लोकांचा रोजगार गेला आहे, याला जबाबदार कोण? असा संतप्त सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते महेश तपासे यांनी केला मोदी सरकारला केला. केंद्र सरकारने नोटबंदी केली, जीएसटी करप्रणाली आणली आणि उद्योगधंद्याना जी चालना मिळायला हवी होती ती मिळाली नाही. त्याचा परिणाम देशात बेरोजगारीने उच्चांक गाठला, असाही आरोप महेश तपासे यांनी केला आहे.