| खांब | प्रतिनिधी |
रा.जि. माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ अंतर्गत रोहा तालुका मुख्याध्यापक संघाच्या तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा सोमवारी (दि.19) कोएसो मेहेंदळे हायस्कूल येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाल्या. कोएसो मेहेंदळे हायस्कूल मुख्याध्यापक आर.एस. यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या या स्पर्धेप्रसंगी संघाचे सचिव विनय मार्गे, सदस्य सुरेश जंगम, नागोठणे हायस्कूल मुख्याध्यापक डि.एस.पवार आदी प्रमुख मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. या स्पर्धेत इ.5 वी ते 7 वी गटामध्ये प्रथम क्रमांक सोनावणे अनुष्का विजय, द्वितीय क्रमांक गायकर मानवी भास्कर व तृतीय क्रमांक म्हात्रे आराध्य प्रफुल्ल याने पटकाविला. तसेच इ.8 वी ते 10 वी गट प्रथम क्रमांक उभारे विश्व जनार्दन, द्वितीय क्रमांक अधिकारी तनुष्का व तृतीय क्रमांक मासक श्रवण शरद याने पटकाविला. 11 वी/12 वी गटामध्ये प्रथम क्रमांक मांडलेकर रूणाली चंद्रकांत व द्वितीय क्रमांक पिंपळे नील नेहाल यांनी पटकावले. या स्पर्धेचे स्पर्धा नियोजन प्रमुख म्हणून के.आर. पाटील यांनी काम पाहिले. तर स्पर्धा प्रमुख टी.यू. पाटील यांनी उत्तम पद्धतीने कामगिरी बजावली. तर परीक्षण नंदकुमार मरवडे, विजय चौधरी, वैशाली पसावे यांनी केले. स्पर्धेचे सुत्रसंचलन व आभार प्रदर्शन के.पी. गावित यांनी केले.
तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात
