| खांब-रोहा | वार्ताहर |
महाराष्ट्र राज्य संलग्न रा.जि.मुख्याध्यापक माध्य. व उच्शच माध्यमिक रोहा तालुका मुख्याध्यापक संघाची सहविचार सभा कोएसो मेहेंदळे हायस्कूल रोहा येथे मोठ्या उत्साहात संपन्न करण्यात आली.
यावेळी मेहेंदळे हायस्कूल प्रा.मोसे,संघाचे सुरेश जंगम, नितीन गोरिवले, विनय मार्गे ढोले, सातेकर, सौ.मुंढे, दीपक जगताप आदी उपस्थित होते. या सहविचार सभेमध्ये विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. शेवटी आभार व्यक्त करून व सातारेकर यांच्याकडून देण्यात आलेल्या स्नेहभोजनाने या सभेची सांगता करण्यात आली.