नांदगाव विद्यालयात तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धा

नांदगाव 4 तर पाली 5 प्रथम पारितोषिकांची कमाई

| पाली/गोमाशी | वार्ताहर |

रायगड जिल्हा क्रीडा परिषद अलिबाग यांच्या वतीने 2023-24 या शैक्षणिक वर्षात तालुकास्तरीय पावसाळी खो-खो आणि कबड्डी क्रीडा स्पर्धा संत नामदेव माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय नांदगाव येथे संपन्न झाली. या स्पर्धेसाठी गटशिक्षणाधिकारी साधुराम बांगारे, प्राचार्य संभाजी ढोपे, तालुक्यातील क्रीडा शिक्षक उपस्थित होते.

तालुकास्तरीय खो-खो स्पर्धेत मुले 14 वर्षे वयोगट संत नामदेव माध्यमिक विद्यालय कनिष्ठ महाविद्यालय नांदगाव, 17 वर्षे वयोगट नांदगाव हायस्कूल, 19 वर्ष वयोगट ग.बा.वडेर हायस्कूल पाली तर मुली 14 वर्षे वयोगट नांदगाव हायस्कूल, 17 वयोगट नांदगाव हायस्कूल, 19 वयोगट ग.बा.वडेर पाली हे विजयी झाले. तर, तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत मुले 14 वर्षे अनुदानित आश्रमशाळा पडसरे,17 वर्षे वयोगट ग.बा.वडेर हायस्कूल पाली,19 वर्ष वयोगट आश्रमशाळा वावळोली तर मुली 14 वर्षे वयोगट आश्रमशाला चिवे, 17 वर्षे वयोगट ग.बा.वडेर पाली, 19 वयोगट ग.बा.वडेर पाली या सर्व विजयी संघाने तालुकास्तरीय स्पर्धेत प्रथम क्रमांकाच्या पारितोषकाची कमाई केली.

या विजयी संघांना भोराई शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सुरेश खैरे, तसेच शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष जगदीश सुतार यांच्या शुभहस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी तालुक्यातील सर्व क्रीडाशिक्षक आणि नांदगाव विद्यालयातील शिक्षक वृंद यांचे मोलाचे योगदान लाभले.

Exit mobile version