गावदेवी बाहे संघ विजेता
| खांब-रोहा | वार्ताहर |
रोहा तालुक्यातील तळवली तर्फे अष्टमी येथे जय हनुमान तळवली यांच्या वतीने व कोलाड कबड्डी असोसिएशन यांच्या मान्यतेने खेळविलेल्या गेलेल्या विभागिय कबड्डी स्पर्धेत गावदेवी बाहे संघाने सर्वोत्तम कामगिरी करून विजेतेपद पटकावले आहे.
नवनिर्वाचित सरपंच रविंद्र मरवडे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलेल्या या कबड्डी स्पर्धेच्या कार्यक्रमप्रसंगी माजी उपसरपंच गजानन बामणे, सदस्य दयाराम मरवडे, हरिश्चंद्र मांगुळकर, सामाजिक कार्यकर्ते रामचंद्र मरवडे, एकनाथ मरवडे, नंदकुमार मरवडे, स्वप्नील मरवडे, मारूती बामणे, अनंता मरवडे, धर्मा मरवडे, धनाजी मरवडे, हरि बामणे, सुरेश वाघमारे, काशिराम गायकर, संतोष चितळकर, भिमेश बामणे, वसंत मरवडे, दिनेश घोगळे, संतोष मरवडे, रामकृष्ण नागावकर आदी मान्यवर उपस्थित होते.
या स्पर्धेत नवतरुण पाले खुर्द या संघाने उपविजेतेपद पटकावले. धाक्सुद चिल्हे व जय हनुमान आंबेवाडी या संघांनी अनुक्रमे तृतीय व चतुर्थ क्रमांक पटकावले. तर सामनावीर म्हणून विजय माठल (बाहे), उत्कृष्ट चढाई कौशल दळवी (पाले), पब्लिक हीरो सनी कोठेकर (चिल्हे), उत्कृष्ट पक्कड मेहुल मोरे (आंबेवाडी) यांना उपस्थितीतांचे हस्ते पारितोषिकं देऊन गौरविण्यात आले. स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी जय हनुमान क्रीडा मंडळाचे सर्व पदाधिकारी व सदस्य यांनी मोलाचे सहकार्य केले.