। पनवेल । वार्ताहर ।
पनवेल जवळील पळस्पे ते जेएनपीटीकडे मार्गावर करंजाडे कलश हिल सोसायटीजवळ उभ्या असलेल्या कंटेनरला पाठमागून आलेल्या टँकरने धडक दिली. या धडकेत टँकरवरील वृद्ध चालकाचा मृत्यू झाला तर अन्य एकजण गंभीर जखमी झाला.
चालकाने त्याच्या ताब्यातील बंद पडलेला कंटेनर रस्त्यातच उभा करून निघून गेला. दुसरा टँकर क्र. एमएच 01 सिवी 4290 वरील चालक रामाश्री बनवारीलाल यादव (वय 62) यांचा गाडीवरील ताबा सुटल्याने त्यांनी उभ्या कंटेनरला जोरदार धडक दिली. यामध्ये त्यांचा मृत्यू झाला तर त्यांचा सहकारी अनुपम यादव हा जखमी झाला आहे. या अपघाताची नोंद पनवेल शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.