| रत्नागिरी | प्रतिनिधी |
मुंबई-गोवा महामार्गावर हातखंबा येथे एक टँकर पलटी होऊन बुधवारी (दि.26) सकाळी अपघात झाला. कीटकनाशकाचे केमिकल घेऊन हा टँकर गोवा येथून मुंबईला निघाला होता. बुधवारी सकाळी हातखंबा येथील चढावात टँकरवरचे चालकाचे नियंत्रण सुटले आणि टँकर मागे जाऊन पलटी झाला. अपघातानंतर केमिकल रस्त्यावर पसरले होते. अपघात घडल्यानंतर पोलीस आणि अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. रस्त्यावर पडलेला टँकर बाजूला करण्याचे काम सुरू करण्यात. दरम्यान दोन तास वाहतूक ठप्प झाली होती.
हातखंबा येथे टँकर पलटी
