आमडोशीसाठी सव्वा कोटींची नळपाणी पुरवठा योजना मंजूर

। नागोठणे । वार्ताहर ।
वांगणी ग्रामपंचायत हद्दितील आमडोशी गावातील नागरिकांसाठी खा. सुनिल तटकरे यांच्या प्रयत्नामुळे केंद्र शासनाच्या जलजीवन मिशनच्या (सन 2022- 23) प्रादेशिक ग्रामीण पाणीपुरवठा योजनेअंतर्गत सुमारे 1 कोटी 18 लाख 62 हजारांची नळ पाणीपुरवठा योजना मंजूर झाली आहे.

या योजनेच्या प्रशासकीय मान्यतेचे पत्र नुकतेच तटकरे यांनी राजिपचे माजी सदस्य चंद्रकांत जांबेकर यांच्याकडे सुतारवाडीतील गिताबाग येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात संपन्न झालेल्या एका छोटेखानी कार्यक्रमात सुपूर्द केले. यावेळी जिल्हा अध्यक्ष मधुकर पाटील, तालुका अध्यक्ष विनोदभाऊ पाशीलकर, महेंद्रशेठ पोटपोढे आदींसह आमडोशी गावातील राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते.

आमडोशीतील ग्रामस्थ गेल्या अनेक वर्षांपासून पाण्याच्या समस्येने त्रस्त होते. विविध भागांत कमी दाबाने होणारा पाणीपुरवठा व इतर अनेक कारणांनी ग्रामस्थांचे व महिलांचे पाण्यासाठी हाल सुरु होते. त्यामुळे सर्व महिलांतून नाराजीचा सूर उमटत होता. या योजनेमुळे महिलांची पाण्यासाठी होणारी वणवण व त्रास आता भविष्यात वाचणार असल्याने ग्रामस्थांमध्ये व विशेषतः महिला वर्गामध्ये आनंदाचे वातावरण आहे.

Exit mobile version